जळगावात मंत्री गिरीश महाजनांना धक्का! खंद्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश!

जून 6, 2026 1:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे तसेच विश्वासू समर्थक मानल्या जाणाऱ्या जळगावमधील अनेक मातब्बर तरुण कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.

GM Supporters joinshivsena

आमदार किशोर पाटील यांनी जळगावातील भाजपच्या या तरुण कार्यकर्त्यांची मजबूत मोट बांधत थेट मुंबई गाठली. मुंबईतील शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व तरुणांचे गळ्यात भगवा पट्टा बांधून अधिकृत स्वागत करण्यात आले.

यांचा झाला पक्षप्रवेश

या पक्षप्रवेशात जळगाव शहरातील भुषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राझिक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी, तौफिक खान या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जळगाव जिल्हा हा मंत्री गिरीश महाजन यांचा गड मानला जातो. मात्र, त्यांच्याच अत्यंत जवळचे, सक्रिय आणि मैदानी पातळीवर काम करणारे तरुण कार्यकर्ते एकाच वेळी शिवसेनेत गेल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now