मित्रांना भेटल्यानंतर तो घरी अन् उचललं नको ते पाऊल ; जळगावातील धक्कादायक घटना

डिसेंबर 5, 2023 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । जळगावातील एका तरुणाने राहत्या घरात छताला दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याचा प्रकार आज मंगळवारी दुपारी उघडकीस आला. शशिकांत देविदास पाटील (वय-३२, रा. गोपाळपुरा, जुने जळगाव ) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jlg news jpg webp

याबाबत अधिक असे की, जुने जळगावातील गोपाळपुरा येथे शशिकांत पाटील हा आपल्या आई व भाऊ यांच्यासोबत राहत असून तो नेरी नाक्याजवळील एसटी वर्कशॉप जवळ पान टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, आज शशिकांत मित्रांना एसटी वर्कशॉपजवळ भेटला होता. त्यानंतर तो घरी गेला. कुठल्यातरी कारणाने त्याने छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी १ वाजता कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला होता.

दरम्यान, नातेवाईकांनी व मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. शनिपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शशिकांत पाटील याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now