जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ऑगस्ट 3, 2021 1:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरातील राजीव गांधी नगरारातील एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सुधाकर मधुकर नाडे (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

crime

याबाबत असे की,  सुधाकर नाडे हा हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात वाद सुरू होतो. दरम्यान, आज राहत्या घरात सकाळी ८ वाजेच्या पुर्वी सुधाकरने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले.

त्याचा मोठा भाऊ बबन नाडे यांनी तातडीन मृतदेह खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.  याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now