---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहित मुलीने संपविले जीवन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । कुऱ्हापानाचे येथील शेतकरी गजानन भिका वराडे यांच्या नवविवाहित मुलीने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून जागृती बराडे मानपाडा येथील घरी गळफास घेत आत्माहत्या केली. जागूती वराहे (क्य २४) असे तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने मोबाईलमध्ये ‘माझ्या आत्महत्येला सासू आणि नवरा जबाबदार असल्याची’ अशी नोट लिहिल्याचे समोर आले.

crime 2 jpg webp webp

त्या आधारावर मानपाडा पोलिस ठाण्यात (डोंबिवली पूर्व) गुन्हा दाखल झाला. दरम्यान, कुटुंबीयांनी अग्निडाग देण्यास नकार दिल्याने जागृतीचा मृतदेह कुऱ्हा पानाचे येथे आणून ७ जुलैला अंत्यविधी करण्यात आले. भाऊ विशालने अग्निडाग दिला. गजानन बराडे यांनी मुलगी जागृतीचा विवाह जळगाव येथील पिंप्राळातील सागर रामलाल बारी (वय ३२) याच्याशी २० एप्रिल २०२४ रोजी लावून दिला. यानंतर ५ जुलैला जाव्ई सागरने जागृतीचा भाऊ विशाल क्राडे याला फोन केला.

---Advertisement---

तुझी बहीण जागृतीने घरातील बेडरूममधील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे सांगून बोलून फोन कट केला, त्यानंतर मुंबई येथे जागृतीची आई वंदना वराडे यांनी, घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे या मागणीसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मुलगी जागृतीने आत्माहत्या केल्याची तक्रार दिली, त्यानुसार पोलिस कर्मचारी पती सागर बारी, सासू शोभा भारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---