रविवार, डिसेंबर 3, 2023

धक्कादायक ! जळगावात 11वीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकरावीचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीने कोणत्यातरी तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील विठ्ठलपेठ परिसरात आज शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (वय-१७) असे मृत मुलीचे नाव असून याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
शहरातील विठ्ठलपेठ परिसरात ट्विंकल ही आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्यास असून ती शहरातील का.ऊखाजी कोल्हे येथे अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ती कोणत्यातरी तणावात होती. दरम्यान आज शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई या नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेले होत्या, तर वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती.

दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते. याचा फायदा घेत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्यावेळाने लहान भाऊ दीपक घरी आल्यावर बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने आरडाओरड करत नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलवले. शेजारी राहणाऱ्यांनी तिला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी यांनी घोषित केले.

याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ट्विंकल हिच्या आत्महत्यांमागील कारण अद्यापही समोर आले नाही तिच्या पश्चात वडील सुरेश चौधरी, आई अर्चना, लहान भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे.