⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

देवदर्शन, परिचितांची भेट घेऊन शेतकऱ्याने घेतला गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ६५ वर्षीय शेतकऱ्याने पिठाच्या गिरिणीच्या स्टोअर रूमला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आलीय. विष्णू रामदास चौधरी (वय ६५, रा. कळमसरे) असे मृताचे नाव आहे.

याबाबत असे की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील रहिवाशी विष्णू रामदास चौधरी यांच्यावर जवळपास तीन ते चार लाखांचे कर्ज झाले होते. शेतीचे उत्पन्न यंदा अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने ते चिंतित होते, असे कुटुंबियांनी सांगितले. मंगळवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे मंदीरावर जावून देवदर्शन घेतले. त्यानंतर सर्व परिचितांची भेट घेतली.

पत्नी आणि मुलगा लग्नानिमित्त बाहेरगावी गेल्याने ते घरी एकटेच होते. त्यांनी आपल्या पिठाच्या गिरणीतील स्टोअर रुममध्ये गळफास घेतला. घटना उघड झाल्यानंतर त्यांना ग्रामस्थांनी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम.पाटील यांनी शवविछेदन केले. त्यानंतर रात्री गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत देवीदास चौधरी यांच्या ख़बरीवरुन मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली. मृताच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते नथ्थू चौधरी यांचे मोठे बंधू, तर विकास चौधरी यांचे वडील होते.

हे देखील वाचा :