⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

एरंडोल येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । हांगिरपुरा भागात रूपाली विश्वनाथ पाटील वय ३४ वर्ष या विवाहितेने घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. रूपाली हिने घरातील पंख्याला साडीच्या लावत गळफास घेत आत्महत्या केली.


विश्वनाथ पाटील हा मालवाहतूक रिक्षा व शेती व्यवसाय करीत. त्याची पत्नी रूपाली ही ब्युटी पार्लर व शिवणकाम करीत. २३ एप्रिल रोजी विश्वनाथ हा त्याची रिक्षा घेऊन रिंगणगाव येथून परत येत असताना विखरण गावाजवळ त्याला फोन वरून त्याच्या घराजवळ लोकांची गर्दी जमल्याचे सांगण्यात आले. तो घरी पोहोचल्यावर त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला समजले. गल्लीतील नागरिकांसोबत विश्वनाथ हा वरच्या मजल्यावर जाऊन पत्नी रूपाली येणे गळफास घेतलेला आढळून आला. तेव्हा ॲम्बुलन्स मध्ये टाकून तिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी अंती तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. विश्वनाथ याला एक मुलगा एक मुलगी वडील व आई असा परिवार आहे