⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अशी असणार मुक्ताईनगरची भव्य औद्योगिक वसाहत

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । मुक्ताईनगर येथे 625 एकर जमीन क्षेत्रफळावरील नियोजित एमआयडीसी औद्योगिक उभारणीसाठी मंजुरी मिळाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात शंभर एकर जमिनीचे भूसंपादन होणार असून त्याबाबतची माहिती अधिकार्‍यांनी बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील उद्योग मंत्र्यांच्या दालनात आयोजित बैठकीत दिली.

औद्योगिक विकास महामंडळाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांसमवेत उद्योग मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील प्रसंगी उपस्थित होते. 625 एकरपैकी सुरूवातीला शंभर एकर व नंतर उर्वरीत क्षेत्र उद्योग व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार संपादित केले जाईल, अशी माहिती बैठकीत अधिकार्‍यांतर्फे देण्यात आली. मुक्ताईनगर मतदारसंघासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न असलेले एमआयडीसी स्थापन होण्याच्या प्रक्रियेला आता हिरवी झेंडी मिळालेली आहे.

यांची बैठकीला उपस्थिती
प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह औद्योगिक वसाहत महामंडळाचे जॉइंट सीईओ रंगा नाईक, जॉइंट सीईओ मलिक नेर, मंत्रालयातील उद्योग विभागाचे देवागावकर, उपसचिव किरण जाधव, औद्योगिक वसाहत महामंडळाचे विभागीय अधिकारी गावीत उपस्थित होते.