67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

जुलै 11, 2026 9:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 67 वर्षीय महिला रुग्णाच्या हृदयातील तीन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये (Triple Vessel Disease) गंभीर ब्लॉकेज आढळून आले होते. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

dr ulhas patil hospital

प्रसिद्ध हृदय व छाती शल्यचिकित्सक (CVTS Surgeon) प्रा. डॉ. यतीन वाघ यांची सेवा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध असल्यामुळे कोणताही विलंब न करता आजच रुग्णावर यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (CABG) शस्त्रक्रिया करण्यात आली.शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्ण धोक्याबाहेर असून अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ, CVTS सर्जन, आधुनिक ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक ICU आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक उपलब्ध असल्यामुळे गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांवर तातडीने आणि उच्च दर्जाचे उपचार शक्य होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

“रुग्णाच्या हृदयातील तीनही प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेज होते. अशा परिस्थितीत वेळेवर बायपास शस्त्रक्रिया होणे अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णालयातील सर्व सुविधा आणि अनुभवी टीमच्या समन्वयामुळे आम्ही तातडीने शस्त्रक्रिया करू शकलो. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक आहे. पुढील काही दिवस निरीक्षणाखाली उपचार सुरू राहतील.”प्राध्यापक डॉ. यतीन वाघ (CVTS सर्जन) :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories