जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील दोघा बहिणींनी डीएडच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. दोघींनी वेगवेगळ्या विद्यालयातून प्रथम येत बहुमान मिळवला आहे.

त्या नांद्रा येथील विनोद बाविस्कर यांच्या कन्या आहेत. बाविस्कर यांची मोठी मुलगी दीपाली बाविस्कर हिने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विद्यालयात तर लहान मुलगी रूपाली बाविस्कर हिने म्हसावद येथील शिक्षणशास्त्र विद्यालयात डी.एडला प्रवेश घेतला होता. दोघी बहिणींनी प्रथम वर्षाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले होते.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









