जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे ।मतदार संघातील जनतेच्या मागणीनुसार मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यास नगरपंचायत हद्दीअंतर्गत विविध विकासकामांसाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजुर झालेला आहे. या निधी मार्फत मुक्ताईनगर-बोदवड नगरपंचायत हद्दीत विकासाला वाव मिळणार आहे.
या निधीअंतर्गत मुक्ताईनगर हद्दीतील प्रवर्तन चौक ते जुने बस स्थानक पर्यत दुभाजकासह रस्ता डांबरीकरण करणे व जुने बस स्थानक ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंत तसेच राज डेअरी ते जुने मुक्ताबाई मंदीर पुलापर्यत रस्ता दुभाजकासह काॅक्रिटीकरण करणे, बऱ्हाणपूर रोडवरील मुक्ताईनगर येथील स्मशानभूमीलगत सरंक्षण भिंत बांधकाम करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक १ मधील कैलास दैवते-सुभाष खुळे यांदरम्यान आरसीसी गटार बांधकाम करणे,प्रभाग ६ मध्ये भुसावळ नाका ते संजय सुरवाडे यांच्या घरापर्यत आरसीसी गटार बांधकाम करणे, प्रभाग ७ मध्ये गुरु पुष्य प्लायवुड आरसीसी गटार बांधकाम करणे, प्रभाग १२,१४,१५,१७ मध्ये आरसीसी गटार बांधकाम करणे,तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीअंतर्गत विविध प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण करणे, वायकोळे यांच्या दवाखान्यापासुन राष्ट्रिय महामार्गापर्यत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे यासारख्या कामांचा मंजुरीमध्ये समावेश आहे.
हे देखील वाचा :
- समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून
- मानव अधिकार दिनानिमित्त तरसोद येथे जनजागृती रॅली
- डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट
- जळगावात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त..
- राज्य सरकारकडून 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर