जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सुभेदार मेजर प्रल्हाद वाघ यांची कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीने व भारतीय सैन्य दलाच्या खडकी (पुणे ) येथील ब्रिगेडीयर सेंटर कमांडर यांच्या हस्ते नुकतीच त्यांना भारतीय सैन्य दलात ऑफिसर रँकमध्ये वाघ यांची कॅप्टन पदासाठी नेमणूक करण्यात आली. याबद्दल माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील, माजी सरपंच हिरामण पाटील, मनोहर लिंगायत यांनी कॅप्टन प्रल्हाद वाघ यांचे भ्रमणध्वनीवरून काैतुक केले आहे. या निवडीबद्दल प्रल्हाद वाघ यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा