1 लाख रूपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात, पोलीस दलात खळबळ

जून 2, 2022 4:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । लाचेचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच आता चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला लाचेची मागणी भोवली आहे. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख रूपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले यास आज लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. या करवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

yogesh dhikale jpg webp

नेमका काय आहे प्रकार?
तक्रारदार यांच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशिट लवकरात लवकर पाठवून गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जनन्नाथ ढिकले (वय-३२) यांनी ४ लाख ५० हजाराची मागणी केली होती.

तडजोडी अंती १ लाख रूपये देण्याचे ठरविले होते. दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार खात्री करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवार २ जून रोजी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले याने १ लाख रूपयांची रक्कम घेतांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

यांनी केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ या पथकाने कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now