⁠ 
रविवार, मे 19, 2024

कोरोना योध्यांना विद्यार्थ्यांनी बांधली राखी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राखी पोर्णिमेनिमित्त गेल्या वर्षांपासून कोरोना काळात समाजासाठी कार्य करणाऱ्या कोरोना योद्धासाठी ‘रक्षाबंधनाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानी त्यांना राखी बांधून रक्षणाचे अनोखे वचन घेतले.

प्रसंगी मंचावर निवृत्त सैनिक गणेश भिकन चौधरी, डॉ. उमेश पाटील या योध्यांसह मुख्याध्यापिका शीतल कोळी मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला ,उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी कोरोना योध्यांचा परिचय करून रक्षाबंधन सणाविषयी माहिती सांगितली. यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करणाऱ्या कोरोना योध्याना आपले कर्तव्य बजावून नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवले, म्हणून दोन्ही योध्यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली. तसेच शिक्षकांनाही विद्यार्थ्यांनी राखी बांधून सण साजरा केला.

यावेळी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनी देखील राखी बांधली. अत्यंत भावपूर्ण हा कार्यक्रम झाला. कोरोना महामारीच्या काळात रक्षाबंधन करू न शकलेल्या कोरोना योध्यांच्या जीवनात आनंद भरण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला, असे संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी सांगितले.

विद्यार्थ्या समवेत शिक्षिका उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, दिनेश पाटील,स्वाती नाईक , प्रियंका जोगी, सोनाली जाधव, पुनम निकम, मेघा सोनवणे, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे , नयना अडकमोल, साक्षी जोगी, दिव्या पाटील आदी उपस्थित होते. .