Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । अमळनेर येथे सध्या शाळा, कॉलेज नियमित सुरू झाले असून येथील डेपोत पास वितरित करण्यासाठी एकच खिडकी सुरू होती. यामुळे शैक्षणिक सवलत पास मिळवण्यासाठी 4 ते 5 दिवस शाळा, कॉलेज बुडवून रांगेत उभे राहून सुद्धा पास मिळत नव्हती, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच पण पास नसल्यामुळे पूर्ण भाडे खर्च करून आर्थिक भुदंड विद्यार्थ्यांना बसत होता. अखेर आमदार अनिल पाटील याची दखल घेतली आहे.
सदर समस्या विद्यार्थ्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यालयात जावून सगितली. त्यांनतर आमदार पाटील यांनी अमळनेर डेपो येथे स्वतः भेट देऊन डेपो मॅनेजर पठाण यांच्याशी चर्चा केली व पास वितरित करण्यासाठी अजून एक खिडकी वाढवून मिळण्यासाठी मागणी केली. या मागणी संदर्भात विभाग नियंत्रक जगनोर यांचीशी दूरध्वनी द्वारा चर्चा करून पास वितरित करण्यासाठी अजून एक वाढीव खिडकी सुरू करण्याची मागणी केली.
दरम्यान, आमदार पाटील यांनी केलेल्या मागणीस तत्काळ प्रतिसाद देऊन विभाग नियंत्रक जगनोर आज पास वितरित करण्यासाठी दुसरी खिडकी उघडून दिली जाईल असे आश्वासन दिले. या प्रसंगी कामगार नेते एल.टी.पाटील, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील व एस.टी.महामंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.