⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | धक्कादायक : एम.एस्सीचे प्रॅक्टिकल करतानाच विद्यार्थी हृदयविकाराच्या झटक्याने गतप्राण

धक्कादायक : एम.एस्सीचे प्रॅक्टिकल करतानाच विद्यार्थी हृदयविकाराच्या झटक्याने गतप्राण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील एम. एस्सीच्या एका विद्यार्थ्याला रसायनशास्त्राचे प्रॅक्टिकल करत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नीलेश झुंबरलाल पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, नीलेश हा दुपारी प्रॅक्टिकल करत असताना चक्कर आल्याने खाली पडला. त्याला ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. डॉ. आशिष पाटील यांनी नीलेशचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले, नीलेशचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत. ते स्वामी विवेकानंद नगर भागात राहतात. नीलेशच्या अचानक झालेल्या निधनाने प्रताप महाविद्यालयाने कार्यालयीन कामकाज बंद ठेवले होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह