⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

विद्यापीठातील सिनेट निवडणुकांमधील चुकीच्या नियुक्त्या थांबवा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । विद्यापीठात काय प्रकार सुरू आहे तो आम्हाला कायदा मानणाऱ्या व्यक्तींना समजण्याच्या पलीकडे दिसत आहे. कारण निवडणूक जाहीर झाल्यापासून ह्यात वेगवेगळे बदल सतत होताना दिसत आहे. त्यामागे नेमका कोणाचा दबाव आपल्यावर आहे हे आपण जाहीर कराल का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. कुणाल पवार यांनी कुलगुरूंना केला असुन चुकीच्या मागण्या थांबविण्याची मागणी केली आहे.

तसेच ऍड. कुणाल पवार यांच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. उमविमध्ये सिनेट निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती पहिले केली? त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जुलै महिन्यात किती नोटिफिकेशन काढले? त्या निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांनी वेळोवेळी फॉर्म भरण्यास मुदत वाढ कोणाच्या परवानगीने दिली? मागील काळात झालेले बोगस नोंदणी समारे १६००० / मतदानाला आम्ही आक्षेप घेतला कारण सन १९९४ नंतरचा विद्यार्थी आपल्या विद्यापीठात एनरोल होत नाहीं कारण कलम १३१ विद्यापीठ कायदा मधील तरतुदी काय आहेत? त्या मतदारांचे आधारकार्ड पदवी प्रमाणपत्र मागितले ते आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहेत का ? त्याचे रेकॉर्ड आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहेत का? असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेच निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांनी राजीनामा का दिला? निवडणूक शाखेतून आतापर्यंत किती अधिकारी ह्यांनी राजीनामा दिले व का दिले ह्याबाबत सत्यता सर्वांना सांगाल का? असा सवाल कुलगुरूंना करण्यात आला आहे.

कुलगुरू यांनी विद्यापीठ कायदा व पीपल्स रिप्रेझेंत अॅक्ट नुसार निवडणुकीची आदर्श सहिता प्रमाणे कुलगुरूंनी माध्यमांमध्ये सांगितल्या प्रमाणे समिती नेमण्याची तरतूद कायद्यात आमच्या माहिती प्रमाणे नाही ती आपण कोणाच्या सांगण्यावरून जाहीर केली त्याचे अवलोकन आम्हास करून द्याल का ? असे सांगत कोण आपल्याला असे नियम सोडून वागण्यास भाग पाडत आहे ह्यासाऱ्या प्रश्नाची उत्तरे आम्हास तत्काळ द्यावी तसेच आपण निवडणूक विषयी मतदारांची कोणतीही यादी प्रसिद्ध करत असाल तर त्यावर सर्वाचा आक्षेप नसल्या नंतरच जाहीर करावी जेणे करून कोणावर अन्याय होणार नाही असे काही चुकीचे झाल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील व त्याविरुद्ध आम्ही योग्य त्या न्यायालयात दाद मागू व आमच्या शैलीने आंदोलन करू त्यामुळे आमच्या साध्या सरळ प्रश्नाची उत्तरे तत्काळ द्यावी अन्यथा आम्हास विद्यापीठात येवून त्याबाबत विचारणा करावी लागेल असा ईशारा अॅड. कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे, गौरव वाणी, गणेश निंबाळकर, राहुल पाटील, राहुल जोशी यांनी केला आहे.