⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

विद्यापीठातील प्रभारी राज थांबवा; एन-मुक्ता संघटनेची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । कुलसचिव, वित्त व जळगाव लेखाधिकारी आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदावर कुणीही व्यक्ती फार काळ टिकत नसून सतत राजीनामा व प्रभारी बदलाचा कार्यक्रम सुरू आहे. राजीनामा सत्राला आता विद्यापीठ कर्मचारी सुद्धा वैतागले आहेत. हे सर्व प्रकार थांबण्यासाठी राज्यपालांनी विद्यापीठात लक्ष घालून उपाय करावे.

शिस्तीचा बडगा उगारून काही शस्त्रक्रिया करावी लागली तरी चालेल पापा विद्यापीठाची लक्तरे वेशीवर टांगता कामा नये, अशी मागणी एन-मुक्ता संघटनेतर्फे राज्यपालाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विद्यापीठात सर्व प्रभारीराज सुरू असताना संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व संचालक, विद्यार्थी विकास या पदांसाठी मात्र अगदी घाईघाईने अर्ज मागवून त्यांची नियुक्ती करण्याचा अट्टाहास का केला, असा आरोप एन मुक्ता प्राध्यापक संघटनेने केला आहे.

हे देखील वाचा :