
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२। एकीकडे महापरिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असताना ज्या बस सुरु आहेत त्यावर होणारे हल्ले देखील थांबत नाही. शुक्रवारी गाडेगाव घाटात रात्री ८ वाजता शिवशाही बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच.१८.बीजी.८७१ ही औरंगाबाद येथून जळगावकडे येत असतांना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फुटून नुकसान झाले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बसवाहतक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (वय-२८) रा. हिंगोणा ता.चोपडा यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गफुर तडवी करीत आहे.
हे देखील वाचा :
- १० हजारांची लाच भोवली! जळगावच्या अधिकाऱ्याची कोट्यवधींची माया उघड, मालमत्ता पाहून यंत्रणाही चक्रावली!
- ज्या प्रेमासाठी हट्ट धरला, त्याच प्रेमाने घेतला जीव; पतीने गळा आवळला पत्नीला संपविले
- २४ तास ऑनलाईन असणारा आरोपी पोलिसांना गवसेना, सुरेश तलरेजा मुख्यमंत्र्यांना भेटणार!
- यावल हादरले ! संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून
- अमळनेरमध्ये वाळू माफियांनी शेतकऱ्याला डंपरखाली चिरडले! चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल





