जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्यानंतर अंगाला लोखंड, स्टीलच्या वस्तू तसेच नाणी अंगाला चिटकत असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये समोर आला होता. त्यानंतर आता एरंडोलमध्येही असाच प्रकार समोर आला आहे.
एरंडोल येथील विद्यानगरातील रहीवासी पी.जी. पाटील यांनी आज शनीवारी ‘अंगाला चिकटू लागली स्टीलची भांडी ही बातमी वर्तमानपञात वाचल्यावर पोहे खात असतांना त्यांनी स्टीलचा चमचा अंगाला लावला असता तो चिकटल्याचा त्यांना अनुभव आला. त्यानंतर त्यांनी १रू., ५रू. व १० रूपयांची नाणी अंगाला चिकटवून पाहीली असता ती देखिल चिकटली हा अद्भूत प्रत्यय आल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहीला नाही.
विशेष हे की चिकटलेली नाणी/वस्तू खाली पडते की काय..? हे पाहण्यासाठी ते किचनमध्ये ईकडे-तिकडे चालत गेले,चालल्यावर सूद्धा वस्तू व नाणी खाली पडल्या नाहीत.
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर हा प्रकार आढळुन आला. कॉलनी परीसरात सध्या या विषयाबाबत कुतूहल पसरले आहे.
पी.जी. पाटील हे खडके खुर्द येथील महेंद्रसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात वरीष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. ९मार्च २०२१ रोजी त्यांनी ‘कोविशिल्ड, लसीचा पहीला डोस व ५ एप्रिल रोजी दुसरा डोस घेतला. त्यांची २१ वर्षे सेवा झालेली आहे. वस्तू चिकटण्याच्या या प्रकाराबाबत शासनाने दखल घ्यावी व त्यामागे वैद्यकीय कारण कोणते आहे..? या बाबत खुलासा होणे आवश्यक असल्याचे पि. जी. पाटील यांनी सांगितले.
सध्या वस्तू चिकटण्याचा हा प्रकार वैद्यकीय दृष्ट्या औत्सूक्याचा विषय बनला आहे. हा चुंबकत्वाचा प्रकार तर नसावा…? नेमका प्रकार कश्याचा आहे असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.