महाविद्यालयांचे फलक मराठीत करण्यासाठी युवासेनेचे निवेदन

एप्रिल 8, 2022 3:52 PM

जळगाव लाईव्ह न्युज । ८ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करण्यात यावे. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना नुकतेच देण्यात आले.

yuvasena 1

युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात येतील त्याबाबत लवकरच पत्रक काढण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी उपस्थित युवासैनिकांना दिले. शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खाजगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, असा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे.

मात्र विद्यापीठाच्या पातळीवर असे होताना दिसून येत नाही. विद्यापीठातील सर्व अधि विभागांची नावे ठळक अक्षरात मराठीत करण्यात यावीत. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत. विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे. अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, जितेंद्र बारी, अमित जगताप, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, गिरीष सपकाळे, भुषण सोनवणे, अमोल मोरे, प्रितम शिंदे, विद्यापीठ युवाधिकारी अनिकेत पाटील, ॲङ अभिजीत रंधे, यश सोनवणे, मयूर रंधे, सागर पाटील, ध्रृवा पाटील, पुष्पक सुर्यवंशी आदि युवासैनिक उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now