राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, जळगावने नाशिक व लातूरला नमविले

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे सुरू असलेल्या 14 वर्षातील  राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जळगाव संघाने सुरुवातीचे दोन्ही  नाशिक व लातूरला नमावून जोरदार आगेकूच केली.

प्रथम सामन्यात नाशिकचा संघ पराभूत
14 वर्षाआतील वयोगटातील स्पर्धेत राज्यभरातील 32 जिल्हा संघाने सहभाग घेतला असून जळगाव संघाने प्रथम सामन्यात नाशिक संघाला 33 पराभूत केले या सामन्यात य यगणेश ठाकूर यांने तीन गडी बाद केले. तसेच दहेश कोल्हेने 20 धावा केल्या. यगनेश ठाकूरला सामनावीराचा सन्मान देण्यात आला दुसर्‍या सामन्यात जळगाव ने लातूर संघाला 31 धावांनी पराभव केले या सामन्यात अष्टपैली कामगिरी करणार्‍या पियुष चव्हाणला सामनावीरचा मान देण्यात आला . पियुष ने एक गडी बाद करत फलंदाजी करताना 30 धावा केल्या. जळगावचे अन्य सामने हिंगोली गोंदिया या संघासोबत होणार आहे.

जळगाव संघ असा
दहेश कोल्हे (कर्णधार), आर्यन पाटील (यष्टीरक्षक), करंणजीत धांडे, निहार पाटील, विनायक चौधरी, चिन्मय चौधरी, सुमेध मस्के, हितेश धांडे, यगनेश ठाकूर, अदवेत हुद्दार, कुणाल पाटील, हिमांशू पाटील, प्रेमसिंग जाधव, कपिल बदे, पियुष चव्हाण ,हर्ष खडसे, आदित्य देव. प्रशिक्षक म्हणून कुलदीप सपकाळे तर व्यवस्थापक म्हणून अबुजर पटेल हे काम बघत आहे.
जळगाव संघाने लागोपाठ दोन सामने जिंकल्यानंतर संघाला शुभेच्छा देताना राज्य संघटनेचे सचिव डॉ.मोहंमद बाबर, जिल्हा सचिव वासेफ पटेल, शिवकुमार कोळे मुकुंद झंन्कर, विशाल पवार लक्ष्मण इंगळे, संदीप गुरव, कैलास माने आदी