लेखक: डॉ. युवराज परदेशी
भाषा: मराठी
प्रकाशक: कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा.लि.
ऑनलाइन खरेदी लिंक: Buy Startup Roadmap Marathi Book
पहिले मराठी पुस्तक ज्याला आहे स्वतःचा AI चॅटबॉट

आजचा काळ हा संधींनी भरलेला आहे. विशेषतः तरुणांसाठी उद्योजकता हा केवळ पर्याय नसून, एक जीवनशैली बनत चालली आहे. अलीकडच्या काही वर्षात स्टार्टअप ही संकल्पना आपल्या देशात बऱ्यापैकी रुजली आहे. सुरुवातीला मोठ्या शहरांपुरता मर्यादित असलेले स्टार्टअपचे विश्व आता लहान शहरांसह ग्रामीण भागापर्यंत विस्तारले आहे. असे असले तरी ग्रामीण भागात स्टार्टअप संकल्पनेचे पाहावा तसा विस्तार झालेला नाही. एकादे दुकान किंवा लहान व्यवसायाला स्टार्टअप समजले जाते. यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. यामुळे स्टार्टअप म्हणजे काय, बिझनेस आणि स्टार्टअपमधील मूलभूत फरक, यशस्वी स्टार्टअप उभारण्यासाठी कोणते टप्पे महत्त्वाचे आहेत ? या सर्व प्रश्नांची उत्तरं मराठीतून मिळणं कठीण जातं.
याच साखळीला पूर्णविराम देणारं पुस्तक म्हणजे
“स्टार्टअप रोडमॅप : यशस्वी उद्योजकतेचा मार्ग”
डॉ. युवराज परदेशी यांनी या पुस्तकात स्टार्टअपच्या संकल्पनेपासून ते व्यवसाय सुरू करून यशस्वी होण्याच्या प्रत्येक टप्प्याचं अत्यंत सोप्या भाषेत, पण सखोल विश्लेषणासह वर्णन केलं आहे.
या पुस्तकातून तुम्हाला, स्टार्टअप म्हणजे काय, आणि बिझनेसपेक्षा वेगळं कसं असतं, योग्य कल्पना कशी निवडावी, मार्केट रिसर्च कसा करावा, को-फाउंडर, टीम बिल्डिंग, ब्रँड डेव्हलपमेंट, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, एंजल इन्व्हेस्टर, इनक्युबेटर, सरकारी योजना, ग्रामीण भागातून स्टार्टअप करणाऱ्यांसाठी विशेष दृष्टीकोन यासह इन्क्यूबेटर्स, एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपॅटलिस्ट आदी संकल्पना साध्या आणि सोप्या भाषेत उलगडून दाखविण्यात आल्या आहेत.
स्टार्टअप रोडमॅप हे पुस्तक वाचून झाल्यानंतर तुम्ही त्याला प्रश्नही विचारू शकता! कारण या पुस्तकाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची जोड देखील देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचनासोबत त्याच्याशी चॅटिंग करण्याचा वेगळा अनुभव देखील मिळेल.
तुमच्याकडे स्वप्न पाहायची हिम्मत आणि ती सत्यात उतरवण्याची तयारी असेल, तर ‘स्टार्टअप रोडमॅप : यशस्वी उद्योजकतेचा मार्ग’ हे पुस्तक तुमच्यासाठी संधीची नवीन दारं उघडेल.
कॉलेज तरुण-तरुणी आणि फ्रेश ग्रॅज्युएट्स, नोकरी करत असलेले पण स्वतःचं काहीतरी सुरू करू इच्छिणारे, ग्रामीण व अर्धशहरी भागातील नवउद्योजक तसेच स्पर्धा परीक्षा देणारे पण alternate career शोधणारे विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
पुस्तकाची ५ ठळक वैशिष्ट्ये:
- सोप्या भाषेतील सखोल माहिती व सहज समजेल अशी मांडणी
- प्रॅक्टिकल दृष्टिकोन – प्रत्येक टप्प्यावर कृतीक्षम सूचना
- ग्रामीण उद्योजकतेवर भर – विशेषतः जिल्हा पातळीवरील तरुणांसाठी उपयुक्त
- प्रेरणादायी शैली – वाचकाला स्वप्न बघायला आणि ती पूर्ण करायला प्रवृत्त करतं
- मराठीतून दर्जेदार कंटेंट – मराठी भाषेतील उच्च दर्जाचं स्टार्टअप गाइड
लेखक परिचय:
डॉ. युवराज परदेशी स्टार्टअप क्षेत्रातील तज्ञ असून त्यांनी अनेक प्रकल्प, कार्यशाळा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो तरुणांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या अनुभवातूनच हे पुस्तक जन्माला आलं आहे.
वाचकांचे अभिप्राय:
“हे पुस्तक वाचून माझी दिशाच बदलली. आता मी स्वतःची एक स्टार्टअप कल्पना validate करण्याच्या मार्गावर आहे!”
– अमोल जाधव, नाशिक“मराठीतून इतकं प्रॅक्टिकल गाइड मिळेल असं वाटलंच नव्हतं. हे पुस्तक तरुणांनी नक्की वाचावं.”
– श्वेता देशमुख, सोलापूर
स्टार्टअप रोडमॅप हे पुस्तक तुम्ही खालील लिंकवर क्लिककरून विकत घेऊ शकता.
१. दीपस्तंभ प्रकाशन
२. Amazon India
३. Flipkart