जळगाव जिल्हा

स्टार्ट-अप वीक 2022 ज्या इच्छुकांनी सहभाग नोंदवावा : प्रशासनाचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । राज्याच्या औदयोगिक तसेच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी आणि बेरोजगाराच्या समस्येवर उपायोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनावर आधारीत उदयोगांना प्रोत्साहन देणे, नियामक आराखडा तयार करुन स्टार्ट-अप इको सिस्टीम ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेंटिव्ह स्टार्ट अप पॉलीसी-2018 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग शासन निर्णय क्र. कौविउ-2017/प्रक्र 243/अभियान-1 दि. 5 फेब्रुवारी, 2018 च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यांत आलेली आहे.

या अनुशंगाने महाराष्ट्र स्टार्ट –अप सप्ताह हा राज्याच्या उदयोजकीय परिसंस्थेला प्रोत्साहन आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करीत असतो. याअंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्यसेवा, कृषी, स्वच्छ उर्जा, पर्यावरण, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता प्रशासन व विविध क्षेत्रातील स्टार्ट-अप यांना त्यांचे अर्ज सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते. यात भाग घेणाऱ्या स्टार्ट-अप मधून 100 स्टार्ट-अपची तज्ञ पॅनेलव्दारे निवड केली जाते. आणि त्यानंतर आठवडाभर चालणाऱ्या स्टार्ट-अप विक कार्यक्रमा दरम्यान सर्वोकृष्ट 24 स्टार्ट-अपची विजेते म्हणून निवड केली जाते आणि विजेत्या स्टार्ट-अप यांना रु. 15 लाखापर्यंत शासकीय कार्यादेश ( वर्क ऑर्डर ) दिल्या जातात.

याचाच एक भाग म्हणून 5 वा महाराष्ट्र स्टार्ट-अप वीक 2022 घोषीत करण्यात आला असून, ज्या इच्छुकांना (स्टार्ट-अप) मध्ये सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी दि.30 मे, 2022 पर्यंत खालील दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शक केंद्र, वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 
     

Related Articles

Back to top button