खुशखबर : जिल्ह्यासाठी आज १ हजार रेमडेसिविर मिळणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. काही जण हे इंजेक्शन ३०-३५ हजारांना विकत असल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. यातच खासदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला मायलन कंपनीचे एक हजार इंजेक्शन प्राप्त हाेणार आहेत.

केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून मायलन कंपनीच्या संचालकांची तसेच ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया व्हि.जी.सोमानी यांच्याकडे जिल्ह्याची कैफियत मांडली. यामुळे एक हजार रेमडीसिव्हर इंजेक्शन मिळवण्यात यश मिळाले असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी कळवले आहे. हा साठा आज प्राप्त हाेणारआहे.

दरम्यान, हेटरो आणि सन फार्मा यांचेकडून देखील इंजेक्शनचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून या कंपन्यांनी दाेन दिवसात इंजेक्शनचा पुरवठा हाेणार असल्याचे खासदार पाटील यांनी कळवले आहे.