⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी बातमी : पावन एक्सप्रेस अपघाताची सोमवारी पुन्हा होणार चौकशी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । पवन एक्स्प्रेसचे 11 डबे घसरल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या अपघाताची चौकशी सीआरएस आयुक्त यांच्याकडून केली जात आहे. सोमवारी पुन्हा अनेकांचे जाब-जवाब नोंदवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


बुधवारी नाशिकरोड स्थानकावर 15 जणांचे जबाब नोंदविण्यात आले. आता उर्वरीत लोकांसह अधिकारी व कर्मचार्‍यांचे जवाब नोंदवले जातील. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार असलीतरी ती किती दिवस चालेल? हे सांगता येणार नाही , असे सूत्रांनी सांगितले. डाऊन पवन एक्स्प्रेस अपघातामुळे तीन प्रवासी जखमी झाले होते तर 11 डबे रेल्वे रूळावरून घसरले होते. अपघाताचे ठोस कारण स्पष्ट झाले नसलेतरी रूळांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात होते. रेल्वे बोर्डाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर रेल्वे सेफ्टी आयुक्त मनोज अरोरा हे या अपघाताची चौकशी करीत आहे. बुधवारी रेल्वेशी संबंधित असलेल्या 15 जणांचे जबाब नोंदविण्यात आले. अपघाताबाबत काही माहिती असल्यास प्रवाशांना आयुक्तांकडे देता येणार आहे. बुधवारी लोको पायलट, गार्ड, तिकीट निरीक्षक, बाजूच्या लाईनीवरून गेलेल्या गाड्यांचे चालक, पवन एक्स्प्रेसच्या अगोदर गेलेल्या गाडीचे चालक, गार्ड, तिकीट निरीक्षक यांचे जवाब नोंदवण्यात आले.