⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मुक्ताईनगरला बैठकीस जाणाऱ्या महिलांसाठी बसफेरी सुरु करा, अन्यथा..

मुक्ताईनगरला बैठकीस जाणाऱ्या महिलांसाठी बसफेरी सुरु करा, अन्यथा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर येथे समर्थाच्या बैठकीस जाणाऱ्या महिलावर्गाची बसेसअभावी गैरसोय होत असून परीसरातील महीलांची गैरसोय टाळण्यासाठी बसफेरी सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुक्ताईनगर बस आगाराचे उपव्यवस्थापाक बाविस्कर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, सेवा सुरु न केल्यास बस आगाराला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

उचंदे, शेमळदे, मेळसांगवे, पंचाने, मेंढोळदे व पुर्नाड या परिसरा मधून मोठ्या संख्येने जवळपास २००च्या वर महिला या श्री.सदगुरु व स्वामी समर्थच्या बैठकीसाठी मुक्ताईनगरला जात असतात. सदर बैठक ही पूर्वी उचंदे येथे होत होती परंतु, आता मुक्ताईनगरच्या आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल जवळ असलेल्या हॉल मध्ये होत आहे, मंगळवारी रोजी वेळ २:१५ ते ५ वाजेदरम्यान असते. परंतु, या वेळेस महिलांना जाण्या येण्यासाठी बसची सुविधा नसल्यामुळे महिला भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात, अश्या परिस्तिथी मध्ये सदर भाविक महिलांसाठी आपल्या आगरा मार्फत त्यावेळेस बस उपलब्ध करून द्यावी, व त्या बसचा थांबा हा आदर्श इंग्लिश मेडीयम स्कुल जवळ देऊन महिला भाविकांच्या भक्तीचा मार्ग सुखकर करून त्यांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करावा,. अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील, उपाध्यक्ष सोनू पाटील, नंदू हिरोळे, संदीप पाटोळे, पवन डापके, राहुल तायडे , ईश्वर सपकाळे , योगेश पाटील, चेतन राजपूत , निखील पाटील, सारंगराजे वैभव पाटील, गोकुळ अटकाळे, चंद्रकांत पाटील, स्वप्नील इंगळे, भूषण धनगर, रामा डहाके, पवन चौधरी आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह