जळगाव शहर

आक्रमक आंदोलन : एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागितली भीक

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । एसटीच्या विलीनीकरणावरून मागील गेल्या ८० दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप अद्यापही कायम असून शासन त्यांची दखल घेत नाही. सरकार दुर्लक्ष करत असल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव एसटी आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलन केले.

Jalgaon ST workers agitation

जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह ‘भीक मांगो’ आंदोलन सुरु केले आहे. भीक मागून जमा झालेली रक्कम राज्य सरकारला देण्यात येणार आहे.

एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टँडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांनी दुकानदार, पादचारी, वाहनधारक अशा सर्वांकडे भीक मागितली. अडीच ते तीन वर्ष वयाची मुलेही या आंदोलनात सहभागी झाले होते. भीक मागून जमा झालेली रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button