⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जिल्ह्यात क्रीडा प्रबोधीनीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु‎

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय‎ आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू‎ घडवण्यासाठी राज्यात‎ प्रतिभावंत खेळाडूंची निवड‎ करुन त्यांना शास्त्रोक्त‎ प्रशिक्षण, शिक्षण, भोजन,‎ निवास, अद्यावत क्रीडा‎ सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या‎ अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत‎ आहे.

यासाठी सरळ प्रवेश व‎ खेळनिहाय कौशल्य‎ चाचणीव्दारे निवासी व‎ अनिवासी प्रवेश देण्यात येणार‎ आहे. यात अमरावती (आर्चरी‎ व ज्युदो), नागपूर (हॅण्डबॉल व‎ ॲथलॅटिक्स), अकोला‎ (बॉक्सिंग), गडचिरोली‎ (ॲथलॅटिक्स), ठाणे‎ (बॅडमिटन), नाशिक (शुटिंग‎ व ॲथलॅटिक्स), कोल्हापूर‎ (शुटिंग व कुस्ती), औरंगाबाद‎ (ॲथलॅटिक्स व हॉकी), पुणे‎ (टेबल टेनिस, वेटलिफिंटग व‎ जिमनॅस्टिक्स) या खेळनिहाय‎ प्रवेश देण्यात येणार आहे.‎ त्यासाठी ९ ते ११ मे पर्यंत‎ क्रीडाधिकारी कार्यालय येथे‎ अर्ज भरुन द्यावे लागणार अाहे.‎