जळगाव शहर

मनपा क्षेत्र आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट जोसेफ स्कूल प्रथम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । श्री.छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल १४ वर्षाच्या आतील मुलांच्या मनपा क्षेत्र आंतरशालेय स्पर्धेत अंतिम विजेता सेंट जोसेफ तर उपविजेता सेंट लॉरेन्स चा संघ ठरला. विजयी व उप विजयी संघांना सुब्रोतो मुखर्जी चषक जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन स्पोर्ट्स हाऊस व पिंच बॉटलिंग तर्फे जळगाव महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त प्रशांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच विजयी व उपविजयी खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक सुद्धा देण्यात आले.

या स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून पोदार इंटरनॅशनल शाळेला चषक व खेळाडूंना कास्यपदक देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अप्पर आयुक्त मनपा प्रशांत पाटील, फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा भुसावळ नगरीचे नगरसेवक इम्तियाज शेख, दुसरे उपाध्यक्ष तथा पिंच बॉटलिंग चे मॅनेजिंग डायरेक्टर जफर शेख, संघटनेचे सचिव फारूक शेख, सहसचिव प्रा डॉ अनिता कोल्हे आदीं उपस्थित होते.

खेळाडूंची जिद्द पाहून त्यांच्या जिद्दीला सलाम-प्रशांत पाटील
भर पावसात सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षा आतील लहान गटातील मुल थंडी पावसाची काळजी न करता आपला संघ जिंकण्यासाठी जे काही प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला मी खेळाडूंचे व उपस्थित त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो. व ही जिद्द व सातत्य त्यांनी कायम ठेवावे जेणेकरून त्यांना आपले करिअर करताना ही जिद्द कामास येते असे गौरवोदगार अप्पर आयुक्त प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

१७ वर्षा आतिल मुलांच्या स्पर्धेला सुरवात!

गुरुवार रोजी १७ वर्षा आतिल मुले स्पर्धेला नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते सुरवात झाली असून यात १३ संघाचा समावेश आहे. शुक्रवार रोजी मुलींच्या स्पर्धेला सुरवात होणार आहे.

स्पर्धा यशस्वीते साठी जैन स्पोर्ट्स अकादमी चे प्रशिक्षक, अब्दुल मोहसिन हे मुख्य पंच असून त्यांच्या नेतृत्वात, सुरज सपके, धनंजय धनगर, आकाश कांबळे, पवन सपकाळे, कौशल पवार, दीपक सस्ते, संजय काजेकर, निखिल पाटील, नीरज पाटील, अल्तमश खान व समीर शेख हे परिश्रम घेत आहे. या पारितोषिक वितरण समारंभाचे आढावा प्रास्ताविक सेक्रेटरी फारुख शेख यांनी सादर केले व आभार सहसचिव प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी मानले. यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती त्यात प्रामुख्याने डॉक्टर पालक आपल्या पाल्याना प्रोस्ताहन देत होते.

Related Articles

Back to top button