⁠ 
बुधवार, मे 1, 2024

Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । जळगाव व जामनेर शहरातील अनेक दिग्गजांच्या घरी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भल्या पहाटे छापेमारी करून त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या काही महिन्यांपासून एका प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. गुरुवारी पहाटेच पथक जळगाव आणि जामनेरमध्ये पोहचले. अनेक दिग्गजांना घरून आणि बाहेरून पथकाने चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त जळगाव लाईव्ह न्यूजच्या हाती लागले आहे. पथकाने ताब्यात घेतलेल्या काही जणांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. एकाच दिवशी झालेल्या या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जळगावातील एका उद्योजकाला सकाळी मॉर्निंग वॉक करताना ताब्यात घेण्यात आले.

पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे , पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली , जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा या सात जणांना अटक केली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी सर्व जणांना ताब्यात घेतले. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई सुरू आहे.

हे देखील वाचा :

आमदार पोहचले जिल्हापेठ पोलिसात

Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात!