दिवाळीमध्ये एसटीने प्रवास करणे महागणार ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय

सप्टेंबर 30, 2025 4:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२५ । सणासुदीच्या काळात अनेक जण कुटुंबासह गावी जातात. याकाळात एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये देखील मोठी गर्दी दिसून येते. मात्र एन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने घेतलेल्या एका निर्णयामुळे एसटीने प्रवास करणे महागणार आहे.

bus 1

मिळालेल्य माहितीनुसार एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भाडेवाड येत्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळासाठी लागू असेल.

घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्वच बसेससाठी लागू होणार नाही. शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अशी भाडेवाढ करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा आहे. या भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now