⁠ 
रविवार, मे 19, 2024

एसटी बसेस मुंबईला.. एरंडोलला बस सेवेवर अत्यल्प परीणाम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । राज्य परीवहन महामंडळाच्या येथील बसआगाराच्या २०ते२२ बसगाड्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथे पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा कोलमडणार अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, दसरा सण व शाळा, कॉलेजला सुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय झाली नाही.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथे एरंडोल बसआगारातर्फे सात मुक्कामी गाड्या व एक भडगाव शटल अश्या एकूण आठ गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने लालपरी गाड्या मुंबई ला रवाना झाल्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा कोलमडणार अशी भिती व्यक्त करण्यात आली होती, मात्र दसरा सणामुळे फारसे प्रवासी बाहेर पडले नाहीत. शाळा महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही. या बस आगारातर्फे बुधवारी २ पुणे, २ नाशिक गाड्या रवाना करण्यात आल्या तर १३ गाड्या मुक्कामी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.