⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

SSC-HSC Result : १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. यापूर्वी कोरोना पार्श्वभूमीवर दोन वर्ष परीक्षा न घेतला निकाल लावण्यात आला होता. मात्र यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडल्या असून आता दहावी-बारावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहे अशातच दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्या तारीख जाहीर करण्यात आली आहे. 10 जून रोजी बारावीचा निकाल लागण्याती शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा 20 जून रोजी लागू शकतो, असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटलंय.

राज्यात एसएससी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती आणि तर एचएससी परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. यापूर्वी गेली दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीसह इतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होती. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावण्यात आला होता. मात्र यंदा प्रत्येक्षात परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडल्या असून या परीक्षेच्या निकालाची आता विध्यार्थी वाट पाहत आहे.

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जून महिन्यात लागणार आहेत. यात दहावी आणि बारावीच्या निकालात अवघ्या 10 दिवसांचा फरक आहे. आधी बारावीचा निकाल १० जूनला लागेल. त्यानंतर दहा दिवसांच्या फरकानं म्हणजेच २० जूनला दहावीचा निकाल जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी TOI शी बोलताना म्हणाले की “शिक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका तपासणे पूर्ण केले आहे आणि उत्तरपत्रिका बारकोडचे परीक्षण आणि स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यातील दाहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल अनुक्रमे 10 जून आणि 20 जून पर्यंत घोषित केले जातील”.

विशेष म्हणजे राज्यातील विनाअनुदानि शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या तपासण्यांचं काम करण्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र या बहिष्काराचा कोणताही परिणाम निकालावर लागण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचं सांगितलं जातंय. सुरुवातीला दहावी बारावीचा निकाल हा विनाअनुदानित शिक्षकांनी तपासण्यांचं काम नाकारल्यामुळे उशिरा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र बोर्डाच्या अचूक नियोजनामुळे पेपर तपासणीचं काम विनाअडथळा सुरु असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

बारावीच्या परीक्षेला यंदा 14.72 लाखांहून अधिक विद्यार्थ्यी बसले होते. तर 16.25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. महाराष्ट्र एसएसी आणि एचएससीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचा स्कोअर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन तपासून आणि डाऊनलोड करू शकतील.

असा तपासा निकाल
महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.
महाराष्ट्र एसएससी किंवा महाराष्ट्र एचएससी निकाल 2022 वर क्लिक करा.
तुमची लॉगिन क्रेडेंशियल जसे की रोल नंबर/नोंदणी क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा आणि submit वर क्लिक करा
तुमचा महाराष्ट्र बोर्ड 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी तो सेव्ह करा.

अधिकृत वेबसाइटची यादी
mahahsscboard.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
mahresult.nic.in