12वी पास उमेदवारांनो ही संधी पुन्हा मिळणार नाही ; राज्य राखीव पोलिस बलमध्ये भरती

मे 22, 2022 2:42 PM

12वी उत्तीर्ण (12th Pass) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलीय. राज्य राखीव पोलिस बल (SRPF Recruitment 2022) मध्ये 105 पदांसाठी अर्ज आमंत्रित केले असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज (Application) करायची पद्धत ऑफलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करायची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

SRPF Recruitment 2022 jpg webp

या भरतीचा प्रकार सरकारी आहे. सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदांसाठी पात्र असणारे इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी परीक्षा घेऊन निवड केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता
या पदासाठी इच्छुक उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे

वयो मर्यादा :
कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांनाच ही संधी उपलब्ध आहे.

परीक्षा फी :
अर्ज शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 450 तर SC/ ST/ OBC/ EWS कॅटेगरीसाठी 350 रुपये आहे.

या पद्धतीने करा अर्ज?
अर्ज ऑफलाइन पद्धतीनं पुढील पत्त्यावर पाठवावेत
1) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली 2) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल) गट क्र 4 हिंगणा रोड नागपूर 3) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

अर्ज करायची शेवटची तारीख – 05 जून 2022

अधिकृत वेबसाईट –
जाहिरात वाचण्यासाठी – Click Here

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now