जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा पंच परीक्षेत भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, संचालक प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, कार्याध्यक्ष शाम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, उपाध्यक्ष चद्रकांतशेठ लोढाया, बशीरजी बागवान, खजिनदार सुनील राणे, पंच मंडळ अध्यक्ष अलेक्झांडर मणी, चैत्राम पवार , ॲड. रोहन बाहेती, मुख्याध्यापक डी. डी. कंखरे, सचिन पाटील, योगेश करंदीकर, जी. पी. एस. परिवारतर्फे राकेश अंकुश धनगर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.