⁠ 
रविवार, मे 19, 2024

मोफत कॅन्सर व नेत्र रोग तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद, ३०० नागरिकांनी घेतला लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० आक्टोबर २०२२ । एरंडोल येथे प्रभाग क्र. २ मध्ये डॉ. नरेंद्र व डॉ. गीतांजली ठाकूर यांच्या सुखकर्ता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत कॅन्सर निदान व नेत्ररोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, शिबिरास परिसरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सुमारे ३०० नागरिकांनी लाभ घेतला.

जैन युवा प्रतिष्ठान, भाजप याच्या सहकार्याने मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन च्या माध्यमातून प्रथमच एरंडोल शहरात मॅमोग्राफी, पॅप स्मिअर व एक्स रे या महागड्या निदान चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रशिक्षित महिला डॉक्टरांनी या अद्ययावत मोबाईल व्हॅन मध्ये ८० महिलांची शास्त्रोक्तयुक्त शारीरिक तपासणी केली. तर २५ संशयित महिलांच्या मॅमोग्राफी आणि पॅप स्मिअरया चाचण्या करण्यात आल्या. जळगाव येथील प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. निलेश चांडक यांनी कॅन्सरमुक्त अभियान अंतर्गत कॅन्सर विषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन च्या माध्यमातून सुखकर्ता फाउंडेशन करत असलेल्या अश्या शिबीरातूनच व इतर जनजागृती च्या कार्यातूनच कॅन्सर चे लवकर निदान होण्यास मदत होणार असून लवकर निदान झाल्यास ८० टक्के रुग्णांना योग्य उपचारानंतर ह्या भयंकर आजारापासून मृत्यू ला रोखण्यास यश मिळू शकते असे स्पष्ट केले

याचवेळी सुखकर्ता फाउंडेशन तर्फे आयोजित नेत्ररोग शिबिरात २०० रुग्णानी नेत्रतपासणी करून घेतली. धुळे येथील डॉ. वीरेंद्र रोडा व टीमने अद्ययावत मशिनरीच्या सहाय्याने आबालवृद्धांची नेत्र तपासणी केली. ५० रुग्णांना यावेळी सुखकर्ता फाउंडेशन कडून मोफत व सवलतीच्या दरात चष्मे वाटप यावेळी करण्यात आले. सुखकर्ता फाउंडेशन तर्फे आयोजित या शिबिराप्रसंगी प्रभागातील १०० महिलांना पर्यावरण पूरक कापडी पिशव्या व स्तन कॅन्सर सम्बधी स्वपरीक्षणाबाबत माहिती असलेले पत्रक ह्याचे वाटप करण्यात आले. शिबिरशुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर डॉ निलेश चांडक, डॉ वीरेंद्र रोडा, एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. सुधीरजी काबरा, माजी नगराध्यक्षाशंकुतला अहिरराव, माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे, एरंडोल येथील डी .डी .एस .पी महाविद्यालय येथील युवती सभेच्या प्रमुख प्रा . स्वाती शेलार ( पाटील ) , ज्येष्ठ संपाद्क प्रा . शिवाजीराव अहिरराव,पत्रकार कुंदन ठाकूर ,दिल्ली येथील डॉ . लता राघव उपस्थित होते.

प्रसंगी प्रा . अहिरराव व छाया दाभाडे यानी सुखकर्ता फाउंडेशन करत असलेल्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचे कोतुक केले. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी उपनगराध्यक्ष डॉ सुरेश पाटील , डॉ राजेंद्र देसले , डॉ . राखी काबरा ,प्रा. आर .एस . निकुंभ , आनंदभाऊ दाभाडे , अमोल जाधव , सुनील चोधरी , प्रशांत महाजन ,विक्रम चोधरी , गोरख महाजन, प्रल्हाद महाजन , नाना महाजन , प्रवीण महाजन ,युवराज पाटील ,अमोल तंबोली , राजू चोधरी ,संजय भदाणे ,जगन कुंभार , सखाराम मोरे ,सागर शिंदे महिला मंडळाच्या पदाधिकारी शोभा साळी ,चंद्रकला जैन ,, रश्मी दंडवते , आरती ठाकूर , सपना शर्मा , गौरी मानुधने, रश्मी बुंदेले यांचा समावेश होता . शिबीर यशस्वीतेसाठी सुखकर्ता फाउंडेशन चे शेखर बुंदेले , सागर ठाकूर , राहुल शिंदे , मंगलताई पाटील , जय श्रीराम प्रतिष्ठाण चे नितीन पाटील ,किसन गवळी , पवन गवळी , वासिम शेख , समीर खान , देवाभाऊ कुंवर , विक्की चोधरी , राहुल चोधरी ,पवन महाजन ,गोरख चोधरी यांनी परिश्रम घेतले. शिबीर शुभारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षमा साळी मॅडम यांनी केले. प्रास्ताविक माजी नगरसेवक डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी केले तर आभार सुखकर्ता फाउंडेशन च्या अध्यक्षा व माजी उपनगराध्यक्षा डॉ गीतांजली ठाकूर यांनी मानले .