⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

युवासेना युनिव्हर्सल पास सेवा कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त युवासेना जळगाव महानगरतर्फे विनामूल्य युनिव्हर्सल पास शिबिराचे २३ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान युवासेना मध्यवर्ती कार्यालय, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, नेहरू चौक जळगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी शिबिराचे उदघाटन युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांकडून पुष्पांजली वाहण्यात आली.

यावेळी युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, विभाग प्रमुख अमोल मोरे, प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, पंकज नाले, सुनील मराठे, वैष्णवी खैरनार, शंतनू नारखेडे, अमित जगताप व राकेश चौधरी आदी युवासैनिक उपस्थित होते.

पहिल्या दिवशी ११८ नागरिकांनी युनिव्हर्सल पास बनवून घेतली. तसेच उपस्थित नागरिकांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. लसीचे दोन डोज घेतलेल्या नागरिकांना सदर युनिव्हर्सल पास बनवून घेता येणार आहे. सार्वजनिक प्रवासासाठी तसेच मॉल्स, सिनेमा गृह इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी सदर पास सक्तीने लागणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी युवासेने मार्फत युनिव्हर्सल पास बनवून घ्यावी अशे आव्हान युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, युवासेना मगनगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी व विशाल वाणी यांनी केले आहे.

हे देखील वाचा :