जळगावप लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । पाचोरात शिवसेनेत फूट पडल्याने शिवतीर्थ शिवसेना कार्यालयाचा ताबा माजी आमदार निष्ठावंत शिवसैनिक स्व.तात्यासाहेब पाटील यांची कन्या व निर्मल सिड्स संचालिका वैशाली सूर्यवंश यांनी घेतला आहे. शुक्रवारी रोजी त्यानी शिवतीर्थ शिवसेना कार्यालयाला भेट दिली. तसेच कार्यालयाची पाहणी केली आहे. यावेळी निष्ठावंत शिवसैनिक सोबत होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ९ आॕगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांची पहिली सभा पाचोरा येथून होणार आहे. त्या अनुषंगाने ५ आॕगस्ट रोजी शिवतीर्थ शिवसेना कार्यालयाचा ताबा वैशाली सूर्यवंशी यांनी घेतला. तसेच पाचोरा शिवतीर्थ शिवसेना कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली व तसे दुरूस्ती चे आदेश दिले. यावेळी निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.