जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. रेल्वेला प्रवाशांची आता हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. यातच जळगावकर रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने सुरतकडून जळगावकडे येणाऱ्या विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या जूनपर्यंत वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे पुणे हावडा मार्गावर धावणाऱ्या एक्स्प्रेस बारा दिवस बंद राहणार आहेत.

या गाड्यांच्या कालावधीत वाढ
०९०५९ उधना-खुर्दा एक्स्प्रेस आता दर बुधवारी ११ जूनपर्यंत धावणार आहे. तर ०९०६० खुर्दा रोड-उधना एक्स्प्रेस १३ जूनपर्यंत दर शुक्रवारी धावणार. याशिवाय ०९०२७उधना-दानापूर साप्ताहिक रेल्वे ही आता ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक गुरूवारी तर ०९०२८ दानापूर-उधना साप्ताहिक रेल्वे ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे.
पुणे हावडा एक्स्प्रेस बारा दिवस बंद राहणार?
दरम्यान बिलासपूर रेल्वे विभागातील कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे पुणे हावडा मार्गावर धावणाऱ्या एक्स्प्रेस बारा दिवस बंद राहणार आहेत. ११ ते २३ एप्रिल दरम्यान, हे काम चालू राहणार आहे. बंद राहणाऱ्या गाड्यांमध्ये आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेस, आणि संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्टीच्या प्रवासी हंगामातच हे काम घेतल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
रेल्वे गाड्या आणि रद्द करण्यात आलेली तारीख
संत्रागाची पुणे एक्स्प्रेस १२ आणि १९ एप्रिल रद्द
पुणे संत्रागाची एक्स्प्रेस १४ आणि २१ एप्रिल रद्द
पुणे हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ११ ते २४ एप्रिल रद्द
हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस ११ ते २४ एप्रिल रद्द
हावडा पुणे दुरांतो एक्स्प्रेस १०, १२, १७ आणि १९ एप्रिल रद्द
पुणे हावडा दुरांतो एक्स्प्रेस १२, १४, १९ आणि २१ एप्रिल रद्द
या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन आधीपासून करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.