प्रलंबित आधार प्रमाणीकरणासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम

ऑक्टोबर 20, 2021 7:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना-२०१९ अतंर्गत जळगाव जिल्ह्यातील १ हजार ६२४ कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकार संतोष बिडवई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

Untitled design 2021 10 20T192751.755 jpg webp

या योजनेचे कामकाज अंतिम टप्प्यात असून त्याअनुषंगाने प्रलंबित आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरण या टप्प्यावरील कामकाज विशेष कालमर्यादेत पुर्ण होण्याच्यादृष्टीने ही मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन १५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर या विशेष मोहिम कालावधीत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी ही अंतिम संधी देण्यात येत आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास या योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही, असेही जिल्हा उपनिबंधक बिडवई यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now