पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोना

फेब्रुवारी 17, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोणाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना बुधवारी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी गुरुवारी कोरोना चाचणी केली. डॉ.मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे क्वारंटाईन झाले आहेत.

बुधवारी जिल्ह्यात २८१ बाधित कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. तर २१६ कोराना बरे होवून घरी परतले. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४८ हजार ९९९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४२ हजार ७८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८४ रूग्णाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६३३ कोरोना बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now