⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात सोयाबीन, मका, ज्वारीला किती मिळतोय भाव? जाणून घ्या..

जळगावात सोयाबीन, मका, ज्वारीला किती मिळतोय भाव? जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२४ । गेल्या आठवड्यापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनसह मक्याची आवक सुरु झाल्याने शेतकरी बांधव आपला माल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे. दोन दिवसापूर्वी साडेतीनशे क्विंटल सोयाबीन तर १०० क्विंटल मक्याची आवक झाली आहे. मात्र दुसरीकडे उडीद, मूगची आवक घटली आहे.

मागील महिन्यात उडीद, मूगची आवक वाढलेली होती. परंतु त्यातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने कडधान्य पिकांना मोठा फटका बसला त्यात. उडीद, मूग, बाजारी पिकालाही फटका बसला. त्यामुळे या आठवड्यात उडीद कमी प्रमाणात तर मूगाची आवक घटली आहे. तर सध्या मक्याची आवक वाढली असून शनिवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल मका विक्रीसाठी दाखल झाला आहे.

सोयाबीन मक्याला किती मिळतोय भाव?
यंदा सोयाबीनला ३७०० ते ४३५० रुपये भाव मिळत आहे. तर मक्याला १७०० रुपये ते १७५० रुपयांपर्यंत भाव आहे. तर ज्वारीला जवळपास १९०० ते २४०० पर्यंतचा दर मिळत आहे. उडीदला ६५०० ते ७००० रुपये दर मिळत आहे.

तीन दिवस राहणार मार्केट बंद?
दिवाळीच्या सणानिमित्त दि.३१ ऑटक्टोबर ते १ आणि २ नोव्हेंबर रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील सुट्टी राहणार असल्याने बंद राहणार आहे. सध्या सोमवारी व बुधवारी असे दोन दिवस बाजार समिती सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांनी या दोन दिवस माल विक्रीसाठी आणावा. तसेच ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान माल विक्रीस आणू नये, असे आवाहन जळगाव कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.