⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

केऱ्हाळे बुद्रुक विकासो‎ चेअरमनपदी सोनवणे‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । रावेर‎ तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील ‎विविध कार्यकारी सहकारी ‎सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप ‎ ‎ सोनवणे तर व्हाईस चेअरमनपदी‎ भूषण गायकवाड यांची बिनविरोध ‎निवड करण्यात आली आहे.‎

केऱ्हाळे बुद्रूक येथील विविध‎ कार्यकारी संस्थेची पंचवार्षिक‎ निवडणूक नुकतिच बिनविरोध‎ झाली. यात दिलीप पांडुरंग सोनवणे,‎ भूषण विश्वनाथ गायकवाड, सुनील‎ जगन्नाथ पाटील, अशोक जगन्नाथ‎ पाटील, विठ्ठल सीताराम पाटील,‎ संजय सीताराम महाजन, सचिन‎ विश्वनाथ गायकवाड, सिताराम‎ वामन पाटील, प्रभावती भास्कर‎ ‎चौधरी, विमलबाई दत्तू पाटील,‎ विजयाबाई भास्कर बावस्कर,‎ संजय भागवत कापडे यांची‎ सदस्यपदी निवड झाली होती.‎ त्यातील सोनवणे व गायकवाड‎ यांची अनुक्रमे चेअरमन, व्हाईस‎ चेअरमनपदी बिनविरोध निवड‎ करण्यात आली आहे. निवडणूक‎ निर्णय अधिकारी म्हणून‎ आर.आर.पाटील यांनी जबाबदारी‎ पार पाडली.‎