⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | महाराष्ट्र | खान्देशातील ‘या’ तालुक्यात महानिर्मितीचा २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

खान्देशातील ‘या’ तालुक्यात महानिर्मितीचा २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महानिर्मितीने खान्देशातील धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-१ (२५ मेगावाट), साक्री-२ (२५ मेगावाट) आणि साक्री-३ (२० मेगावाट) चा समावेश आहे. यापैकी साक्री-१ येथे २५ मेगावाटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मेसर्स गोदरेज आणि बॉयस या विकासकाने इ.पी.सी. (अभियांत्रिकी खरेदी आणि उभारणी तत्वावर) हा प्रकल्प विकसित केला असून क्रिस्टलाईन पद्धतीचे सौर पॅनेल आहेत. या प्रकल्पाची कॅपॅसिटी युटीलायझेशन फॅकटर (सी.यु.एफ.) २०.५९ टक्के असून वार्षिक वीज निर्मिती ४५.०९ दशलक्ष युनिट अपेक्षित आहे.

२१ ऑगस्ट रोजी हा सौर प्रकल्प कार्यान्वित करून २२०/३३ के.व्ही. शिवाजीनगर, साक्री उपकेंद्राशी यशस्वीरित्या जोडण्यात आला. साक्री-१ प्रकल्पामुळे ५० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता ४२८ मेगावाट इतकी झाली आहे.

साक्री-१ प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
या प्रकल्पासाठी ५२ हेकटर जमीन संपादित करण्यात आली असून प्रकल्प खर्च ९३.१२ कोटी इतका आहे. या प्रकल्पातून उत्पादित वीज ही खुल्या बाजारात विकण्यात येणार आहे.

“साक्री” महानिर्मितीचे सोलर हब
साक्री येथे महानिर्मितीचा १२५ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मागील सुमारे दहा वर्षांपासून कार्यरत आहे. त्यात साक्री-१,२,३ सौर प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकाच ठिकाणी सुमारे १९५ मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या या सौर प्रकल्पामुळे साक्री महानिर्मितीचे “सोलर हब” म्हणून नावारूपास येणार आहे.

महानिर्मिती पॉवर ट्रेडिंग क्षेत्रात
जुलै २०२४ पासून महानिर्मितीने सेझ बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड,पुणे समवेत १५ मेगावाट सौर वीज वितरणाचा करार केला आहे.

प्रगतीपथावर सौर ऊर्जा प्रकल्प
साक्री-१ येथे २५ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मेसर्स गोदरेज एन्ड बोएस कंपनी तर साक्री-२ हा २५ मेगावाटचा सौर ऊर्जा प्रकल्प टाटा पॉवर सोलर सिस्टम , साक्री-३, हा २० मेगावाट स्थापित क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मेसर्स स्वरयु पॉवर करीत असून लवकरच हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

ऊर्जामंत्र्यांनी केले महानिर्मितीचे अभिनंदन
साक्री-१ येथे २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने राज्याचे उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी महानिर्मिती अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी संचालक(प्रकल्प) अभय हरणे आणि (नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि नियोजन)चमुचे तसेच मेसर्स गोदरेज एन्ड बॉयस च्या अधिकारी, अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.