तर आम्ही ‘त्या’ अफवा पसवणाऱ्यांना ठिकाणावर आणू – आ. शिरीष चौधरी
जळगाव लाईव्ह न्यूज ।२५ सप्टेंबर २०२२ । शनिवारी संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये पुन्हा जाणारा अश्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या समतातच त आता काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या.
यावर आमदार शिरीष चौधरी यांनी सडेतोड उत्तर दिल आहे. माझ्या भाजपा प्रवेशाबाबत विरोधकांसह पक्षातील काही विष पसरवणारी माणसं या अफवा पसरवत आहेत. पक्षातील या माणसांचा बंदोबस्त करा अन्यथा चौकटी बाहेर जाऊन आपण यांना ठिकाणावर आणू. असा इशारा काँग्रेसचे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी यांनी दिला आहे. जळगाव येथे काँग्रेस भवनात आयोजित पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते
यावेळी शिरीष चौधरी म्हणाले की, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकू लागले आहे. राहुल गांधी देश पिंजून काढत आहेत. कार्यकर्त्यांनी आपला भाग पिंजून काढावा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपच्या खोट्या आश्वासनांचा प्रतिवाद करावा लागणार आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या फार पसरवल्या जात आहेत. तीन पिढ्यांपासून आम्ही काँग्रेसचे पाईक आहोत. गद्दारी आमच्या रक्तात नाही. मात्र आपल्या पक्षातील काही विष बसवणारी माणसं हे काम करत आहेत. अशांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही चौकटी बाहेर जाऊन यांना ठिकाणावर आणू असे यावेळी शिरीष चौधरी म्हणाले.
याचबरोबर रावेरची जागा आमची आहे. उल्हास पाटील हे आमच्यासाठी माझी नसून आजी खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादीने आम्हाला नेहमीच दाबले आहे. पक्ष नेतृत्वाने याबाबत दखल घ्यावी असेही आमदार चौधरी म्हणाले.