…तर उद्या शेतकरी महावितरण कार्यालयावर

एप्रिल 7, 2022 4:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । सावदा परिसरातील शेती फिडरची लाईट झिरो करण्यात येते. त्यामुळे बंद असलेली लाईट आज रात्री भरून द्यावी व सुरळित करावी अन्यथा महावितरणच्या सावदा कार्यालयावर शेतकरी येतील. अशा इशारा जि.प.उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी दिला.

eshara jpg webp

गेल्या दोन दिवसापासुन सावदा परिसरातील शेती फिडरची रात्रीची लाईट झिरो लोड खाली पुर्ण बंद करण्यात येत असल्याने आज सकाळी ७.३० वाजता जि.प.उपाध्यक्ष तथा भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जिल्हाचे अधिक्षक अभियंता यांनी पण लाईट देणे किवा बंद करणे माझ्या हातात नाही असे उडवा उडवीचे उत्तर दिले.

या विरोधात आज रात्री बंद असलेली लाईट भरून द्यावी व आज रात्री ची लाईट सुरळित द्यावी अन्यथा महावितरणच्या सावदा कार्यालयावर शेतकरी येतील असे ठणकावले आहे. तसेच विजपुरवठा सुरळीत न मिळाल्यास उद्या दि.८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालय सावदा येथे परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now