---Advertisement---
जळगाव जिल्हा

भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेसचे स्लीपर आणि जनरल कोच वाढले; प्रवाशांना दिलासा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२४ । रेल्वेच्या जनरल डब्यांची संख्या कमी असल्यामुळे जनरल डब्यांमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही. त्यामुळे अनेकांना तिकीट काढून सुद्धा शौचालयाजवळ बसून प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे-दानापूर-पुणे रेल्वेचे स्लीपर आणि जनरल कोच वाढवण्यात आले आहे.

train 3 jpg webp

रेल्वे क्रमांक १२१४९/१२१५० पुणे-दानापूर-पुणे ही भुसावळमार्गे धावते. नवीन कोचच्या रचनेनुसार आता या रेल्वेमध्ये एकूण २३ कोच असतील. यात २ वातानुकुलित द्वितीय श्रेणी कोच, ६ वातानुकुलित तृतीय श्रेणी कोच, ७ शयनयान श्रेणी कोच, ४ सामान्य श्रेणी कोच, १ पेंट्री कार, १ जनरेटर कार, १ एसएलआरडी आणि २ पार्सल व्हॅन असणार आहे.

---Advertisement---

आज शेतकरी समृध्दी रेल्वे धावणार शेतकरी, व्यापाऱ्यांचा माल परराज्यात पोहचवण्यासाठी शनिवारी दुपारी ४ वाजता जळगाव स्थानकातून शेतकरी समृद्धी रेल्वे धावणार आहे. या रेल्वेत १० प्रवासी डबे सुध्दा असणार आहेत. त्यामुळे मालासोबत शेतकरी, व्यापाऱ्यांना देखील प्रवास करता येणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---