किन्ही शिवारात स्लॅबच्या प्लेट लांबविले!

ऑगस्ट 29, 2022 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारातील एमआयडीसी प्लॉट नंबर एच.96 येथभल कंपनीच्या आवारातून अज्ञात चोरट्याने सुमारे 70 हजार रुपये किंमतीच्या स्लॅबच्या प्लेट लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

किन्ही शिवारात कंपनीच्या आवारात ठेवलेल्या स्लॅबच्या प्लेट सोमवार, 22 रोजी संध्याकाळी सहा ते 23 ऑगस्टच्या सकाळी आठ दरम्यान कोणी तरी चोरट्यांनी प्लेट चोरून नेल्यात. याप्रकरणी गौरव अनिल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संदीप बडगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now