जळगाव लाईव्ह न्युज । १३ मे २०२२ । मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या आरोग्य विभागाने आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने एकत्रित येत शहरातील विविध भागातून सहा टन प्लास्टिक जप्त केले. MIDC, दाणा बाजार, फुले मार्केट व इतर परिसरातून मनपाच्या पथकाने ही मोठी कारवाई करून दाखवली.
सकाळी सहा वेगवेगळ्या पथकांचे नियोजन करण्यात आले होते. गोपनीय माहितीच्या आधारे व ही माहिती कोणत्या नव्या माणसाला मिळू नये म्हणून कोणत्याही पथकाला काय काम करायचे आहे. याबाबतची कोणतीही माहिती मनपा तर्फे देण्यात आली नव्हती. मात्र अचानक मनपा आयुक्तांनी स्वतः अशा ठिकाणांवर धाड टाकत प्लास्टिक जप्त करण्याचे काम केले.
मनपा आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे प्लॅस्टिक विक्रेत्या व्यावसायिकांमध्ये मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अशा रीतीने प्लास्टिकची विक्री होत असल्यास ती ताबडतोब थांबवावी असे आदेश मनपा आयुक्तांनी पारित केले होते मात्र आदेशानंतरही आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर मनपा आयुक्तांनी अशी धडाकेबाज कारवाई केली.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड झाल्यापासून मनपा कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे यामुळे रोज नवनवीन कारवाया विषयी माहिती समोर येत आहे.